आमच्या विषयी
भारत देश हा खेड्यांचा देश आहे. सर्वप्रथम खेड्याचा विकास झाला तर देशाचा विकास आपोआप होईल. तुकडोजी महाराजांच्या याच विचाराचा धागा पकडत पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाने स्वयंपूर्ण गाव करण्याचा कृतिशील कार्यक्रम राबविण्यास गेल्या वीस वर्षांमध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. 'कन्हेर' धरणामुळे १९७८ मध्ये सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे स्थलांतरित व्हावं लागलं. या ठिकाणी चिंचणी गावाला १०० एकराची जमीन व १५ एकराचे गावठाण मिळाले.
आज या गावात जवळपास ६० ते ६५ च्या आसपास कुटुंब आहेत. 'गाव हा विश्वाचा नकाशा गावावरुन देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा येईल देशा' या उबतीनुसार पिढीने चिंचणीचा चेहरामोहरा बदलून या ठिकाणी प्रतिमहाबळेशवर निर्माण करायच निर्णय घेतला.तरुणांनी चिंचणी गावातील सर्व ग्रामस्थांना एकत्र आणलं आणि दुष्काळी माळावर प्रति महाबळेश्वर उभा करायचं आणि आपल्या गावलाच महाराष्ट्रामधलं पहिले 'ग्रामीण व कृषी पर्यटन गाव' म्हणून विकसित करायचं आहे. आज या गावाला ग्रामीण व कृषी पर्यटनाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'क' वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. हे गाव पर्यटन स्थळ म्हणून आणि झाडांचं गाव म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये वारूपाला येत आहे. गाव स्वच्छ करायचं सुंदर करायचं आणि पुन्हा पुणे किंवा मुंबईला नोकरीसाठी जायचं यापेक्षा याच गावातील तरुणांना, स्त्रीयांना, पुरुषांना रोजगार मिळाला पाहिजे. गावातील लोकांचं नोकरीसाठी होणारं स्थलांतर थांबलं पाहिजे. या भावनेतून तरुणांनी गावाच्या सार्वजनिक मालकीचे व संपूर्ण गावाला रोजगार देणारे 'चिंचणी ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्र'
व्हिडीओ गॅलरी
YouTube व्हिडीओ गॅलरी
Clients







